उत्तरप्रदेशातील उच्चपदस्थांना हटवा; भाजपचे हस्तक असल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप
Updated On:

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेशातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना त्वरीत हटवावे अशी मागणी समाजवादी पक्षाने एका निवेदनाद्वारे केली आहे. हे अधिकारी भाजपचे हस्तक असल्यासारखे वागत असल्याची त्यांची तक्रार आहे.
ज्या अधिकाऱ्यांना हटवण्याची समाजवादी पक्षाने मागणी केली आहे त्यात राज्याचे पोलिस महासंचालक प्रशांतकुमार, अतिरीक्त पोलिस महासंचालक अमिताभ यश, सेक्रेटरी अवनिश अवस्थी, माहिती सचिव नवनीत सहगल, यांचा समावेश आहे.
हे अधिकारी पदावर असताना राज्यात मुक्त आणि निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया होऊ शकत नाही अशी समाजवादी पक्षाची तक्रार आहे. हे अधिकारी भाजपचेच कार्यकर्ते असल्यासारखे राज्यात वागत आहेत असेही त्यांचे म्हणणे आहे. या मागणीवर त्वरीत कार्यवाही होणे गरजेचे आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.





