मुंबई – बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा ( Remo DSouza ) याला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका ( heart attack ) आला. यानंतर त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेमोच्या हृदयात काही ब्लॉकेज होते. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी अँजिओग्राफी केली असून तो सध्या आयसीयूमध्ये होता. त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. पुढील 24 तास खूप महत्त्वाचे आहेत, अशी माहिती रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने दिली होती.
View this post on Instagram
मात्र आता रेमोचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली आहे. हार्ट अटॅक आल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता सांगितलं जात आहे की, कोरिओग्राफरची तब्येत आता आधीपेक्षा बरीच चांगली आहे.
View this post on Instagram
रेमोने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत स्वत: सांगितलं की, आता तो बरा झाला आहे. त्याने त्याच्या फॅन्सचेही आभार मानले आहेत. नेहमीप्रमाणे त्याने हा संदेश फॅन्सपर्यंत पोहोचवला आहे. सोशल मीडियावर रेमोने मोशन व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
दरम्यानं रेमोची पत्नी लिजेल ही कॉस्च्युम डिझायनर आहे. तिला आणि रेमोला दोन मुलं आहेत. रेमो यांच्या तब्यतेची चौकशी करण्यासाठी कोकिलाबेन रुग्णालयात बॉलिवूड कोरिओग्राफर धर्मेश, सलमान, कृति महेश आणि अभिनेता आमिर अली गेले होते.