Remdesivir injection | रेमडेसिवीर’चा साठा करणे अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुजय वीखेंना टोला

Updated On:
Remdesivir injection | रेमडेसिवीर’चा साठा करणे अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुजय वीखेंना टोला

मुंबई : लोकप्रतिनिधी असले तरीही रेमडेसिवीर या औषधाचा साठा करणे अयोग्य आहे, असा शाब्दिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना खासदार सुजय विखे-पाटील यांना लागवला.

पुढे ते म्हणाले, आदरणीय खासदार शरद पवार यांनी देखील अनेक जिल्ह्यांना रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले. मात्र हे करताना त्यांनी जिल्हाधिकारी किंवा शहरांच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे रेमडेसिवीर सुपूर्द केले. प्रशासन जी यंत्रणा राबवते त्यांच्याकडे ही गोष्ट देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सुजय विखे यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सत्ताधारी किंवा विरोधक कोणीही असले तरी सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. तसेच ते जनतेच्या हिताचे आहे का हे तपासून पुढील निर्णय घ्यावे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, कोरोना संकटात इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना अहमदनगरचे भाजप खासदार डॉ सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा मोठा कोटा आणला. सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली होती. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती दिली होती.

परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करुन आणल्यामुळे उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2910006615946165/

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

2026-10-06 05:00:33

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?

2026-10-04 09:03:29

Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?

Ganesh Visarjan Pune : 'एवढाच निरोप सांगा बाप्पाला...’; गणेश विसर्जनादिवशी अजित पवारांची आठवण, पुण्यातील बॅनरने वेधले लक्ष

2026-09-25 10:29:07

Ganesh Visarjan Pune : 'एवढाच निरोप सांगा बाप्पाला...’; गणेश विसर्जनादिवशी अजित पवारांची आठवण, पुण्यातील बॅनरने वेधले लक्ष

Rohit Pawar : विकासकामे थांबवून दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची सरकारकडे मागणी

2026-09-20 19:30:20

Rohit Pawar : विकासकामे थांबवून दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची सरकारकडे मागणी