पुणे – दि विश्वेश्वर सहकारी बँकेच्या सोमवार / रास्ता पेठ शाखेचे शॉप नं. 3 इंद्रप्रस्थ प्लस, ५८८ रास्ता पेठ येथील नवीन वास्तुमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या नवीन जागेचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष अनिल भरतशेठ गाडवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना अनिल गाडवे म्हणाले, “ दि विश्वेश्वर सहकारी बँक ही ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. ग्राहकांच्या सोयीसाठी सदर शाखेचे स्थलांतर करण्यात आले असून, ही शाखा आता तळमजल्यावर असल्याने ज्येष्ठ नागरीक खातेदारांना बँकेत येऊन आपल्या व्यवहाराची पूर्तता करणे, अधिक सोयीस्कर होईल. बँकेने सर्व उद्दिष्ट साधत, मार्च २०२३ अखेर एकूण व्यवसायाचा २९०० कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत व्यवसायात ३५० कोटी रुपयांनी वाढ केली आहे.
या कार्यक्रमप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष श्रेयश रुकारी, संचालक सर्वश्री सुनील रुकारी, राजेंद्र मिरजे, अमोल मणियार, मनोज साखरे, अजय डोईजड, दत्तात्रय कामठे, रवींद्र महाजन, सुभाष लडगे, चिंतामणी वैजापूरकर, सुनील फाटक, संचालिका रत्ना कसबेकर, सुलभा कोकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे, बँकींग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, दीपक मानकर, शिवाजी मानकर, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र किराड मान्यवर सभासद व ग्राहक उपस्थित होते.