मंदाकिनी खडसे यांना 20 जूनपर्यत दिलासा
Updated On:

मुंबई – भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलेला दिलासा आता थेट 20 जूनपर्यंत कायम ठेवला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीला मंदाकिनी खडसे चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहेत. यासाठी आजवर त्यांनी तब्बल पंधरावेळा चौकशीसाठी हजेरी लावलेली आहे, अशी माहिती त्यांचे वकील मोहन टेकवडे यांनी न्यायालयात दिली.
याची नोंद घेत न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र वेळेअभावी ती होऊ शकली नाही. त्यामुळे दिवसाचे कामकाज संपण्यापूर्वी त्यांचे वकील मोहन टेकावडे यांनी न्यायालयापुढे दाद मागताच ही सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब करत न्यायालयाने आधीचे आदेश कायम ठेवले.
टॅग्स:





