निलंबित डिआयजी मोरेंना अटके पासून दिलासा
Updated On:

मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या डिआयजी निशिकांत मोरे यांना उच्च न्यायालयाने अटकेपासुन दिलासा दिला. मोरे यांनी तपासाला समोरे जावे.
नवी मुंबई पोलिसांना तपासात सहकार्य करण्यासाठी निशिकांत मोरे यांनी 29, 30 आणि 31 जानेवारी रोजी तळोजा पोलीस स्थानकांत हजेरी लावावी, असे आदेश न्या. प्रकाश नाईक यांनी दिले आणि मोरे याना अटक करण्याची गरज भासल्यास त्यांची 25 हजारांच्या जामिनावर सुटका करावी असे निर्देश पोलिसांना दिले.
सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर डिआयजी निशिकांत मोरे यांच्यावतीने उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्या अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने मोरे यांना दिलासा देताना अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 17 फेब्रुवारीपर्यंत तहकूब ठेवली.





