FASTag KYC | देशातील प्रत्येक वाहनधारकांकडे फास्टॅग असणे अनिवार्य आहेत. मात्र फास्टॅगच्या नियमात बदल करत काहीसा दिलासा देण्यात आला आहे. आता नवीन फास्टॅग घेण्यासाठी अनिवार्य असलेली ‘KYV’ (Know Your Vehicle) प्रक्रिया १ फेब्रुवारी २०२६ पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नवीन फास्टॅग घेताना किंवा सक्रिय करताना वाहनधारकांना होणारा मनस्ताप आता थांबणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)ने वाहनांसाठी KYV प्रक्रिया बंद केली आहे. NHAI ने याबाबत घोषणा केली आहे. यामध्ये १ फेब्रुवारी २०२६ पासून नवीन वाहनांसाठी फास्टॅग KYVकरावी लागणार नाही. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. याआधी कार, जीप किंवा व्हॅनसाठी नवीन फास्टॅग घेताना ‘नो युअर व्हेईकल’ (KYV) ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र अनेकदा कागदपत्रे वैध असूनही या प्रक्रियेमुळे टॅग सक्रिय होण्यास उशीर होत असे. मात्र आता NHAI ने ही प्रक्रियाच रद्द केली आहे. आता सरकारने नवीन फास्टॅगसाठी स्वतंत्र केवायसीची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. मात्र वाहनांच्या रजिस्ट्रेनची पडताळणी केली जाणार आहे. फास्टॅग खरेदी करताना या सर्व माहितीची पडताळणी केली जाणार आहे. प्रक्रिया सोपी केली असली तरी सुरक्षेसाठी NHAI ने बँकांसाठी नियम कडक केले आहेत. आता फास्टॅग सक्रिय करण्यापूर्वी बँकांना ‘वाहन’ (VAHAN) डेटाबेसवरून वाहनाची माहिती पडताळणे अनिवार्य असेल. जर माहिती डेटाबेसमध्ये नसेल, तरच आरसी बुकद्वारे पडताळणी केली जाईल. जुन्या फास्टॅगधारकांसाठी काय बदल होणार? ज्यांच्याकडे आधीच फास्टॅग आहे, त्यांनाही आता नियमितपणे KYV करण्याची गरज नसेल. जर कोणत्याही तक्रारी नसतील तर फास्टॅग सर्व्हिस सुरु राहिली. परंतु जर चुकीच्या पद्धतीने फास्टॅग जारी केला असेल तर त्याची चौकशी केली जाणार आहे. बँकांना फास्टॅग करण्यापूर्वी संपूर्ण पडताळणी करावी लागणार आहे. हेही वाचा: “राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावाने पाटी कोरी”; केंद्रीय मंत्र्याचा खोचक टोला