अॅमेझॉनशी व्यवहाराचा रिलायन्सकडून इन्कार
Updated On:

मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीजमधील रिलायन्स रिटेलचे 20 अब्ज डॉलरचे भागभांडवल अॅमेझॉन कंपनीला विकण्याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीज चर्चा करीत असल्याचे वृत्त काल वृत्त माध्यमात फिरत होते. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजकडून याचा इन्कार करण्यात आला आहे.
या व्यवहारातून दोन्ही बाजूंचा कसलाही हितसंबंध जोपासला जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही चर्चा खरी नाही, असे रिलायन्स इंडस्ट्रीजमधील सूत्रांनी काही वृत्तसंस्थांना सांगितले आहे. वृत्त माध्यमातील या संबंधातील बातम्यांमुळे काल रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 7 टक्क्यांनी वाढला होता.





