-->

भारताबरोबरचे संबंध कमला हॅरिस यांच्यासाठी महत्वाचे

वॉशिंग्टन, दि. 22- अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर कमला हॅरिस भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर द्यायचे ठरवले आहे. व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. वडील जमैकाचे आणि आई भारतीय असलेल्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या प्रथम भारतीय वंशाच्या, अश्‍वेत आणि महिला उपाध्यक्षा ठरल्या आहेत. त्यांच्याच पुढाकारामुळे अध्यक्ष बायडेन यांनी अमेरिका-भारत संबंध अधिक विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव जेन पास्की यांनी सांगितले.

बायडेन हे अध्यक्ष होण्यापूर्वी अनेकवेळा भारत दौऱ्यावर येऊन गेले आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांमधील संबंधांबाबत त्यांना विशेष आदर आहे. भारतीय वंशाच्या असल्यानेच बायडेन यांनी कमला हॅरिस यांना उपाध्यक्षपदासाठी निवडले आहे. आता दोन्ही देशांमधील संबंध अधिक घट्ट करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही पास्की म्हणाल्या.

बुधवारी हॅरिस यांनी शपथविधीनंतर आपल्या आईचे स्मरण केले, आईने आपल्यावर विश्‍वास दाखवला त्यामुळेच आपण या पदापर्यंत पोहोचू शकल्याचे हॅरिस म्हणाल्या.  आई शामल गोपालन भारतातून अमेरिकेत आली. बहिण माया अणि आपला सांभाळ आईन केला. तिच्यासठी आम्ही पहिल्या कन्या असू. मात्र अखेरच्या नक्कीच नव्हतो, अशा शब्दात हॅरिस यांनी आईबद्दलची कृतज्ञता व्यक्‍त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.