Rekha: बॉलीवूडमध्ये रेखा आणि अमिताभ बच्चन ही जोडी खूप लोकप्रिय होती. दोघांनी अनेक चित्रपटांत काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली. रेखा यांनी राजेश खन्ना, धर्मेंद्र यांसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबतही खूप काम केले. पण अमिताभ यांच्याच आणखी एका सह-अभिनेत्रीशी म्हणजे मौसमी चटर्जीशी रेखाचे संबंध मात्र चांगले नव्हते. दोघींमध्ये एकदा सेटवर चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय झालं होतं? रेखा आणि मौसमी दोघी राजेश खन्ना यांच्यासोबत ‘भोला भोला’ या चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या. चित्रपटाचं पोस्टर जेव्हा प्रसिद्ध झालं, तेव्हा त्यात रेखा यांना प्रमुख जागा देण्यात आली होती. हे पाहून मौसमी चटर्जी नाराज झाल्या. त्यांनी निर्मात्यांना पोस्टर बदलण्याची विनंतीही केली, पण ती मान्य झाली नाही. यामुळे सेटवर दोघींमध्ये वाद झाला. मौसमी यांचा रेखांवर आरोप माध्यमांशी बोलताना मौसमी यांनी सांगितले की, त्यांना रेखांचे वागणे पसंत नव्हते. रेखा त्यांच्यासमोर वेगवेगळे चेहरे करायच्या. त्यामुळे त्यांनी एकदा थेट रेखाला विचारलं, “जर हिंमत असेल तर माझ्यासमोर असं करून दाखव.” मौसमी म्हणाल्या की हा प्रसंग रेखाला आठवत असेल की नसेल, पण त्यांना मात्र तो चांगलाच लक्षात आहे. रेखा आणि मौसमी चटर्जी यांच्यातला हा वाद एक जुना किस्सा असला तरी, त्या काळात चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या नातेसंबंधात किती स्पर्धा आणि तणाव होता, याचीच झलक यातून दिसते.