पुणे – ग्रामीण भागातील दस्त नोंदणीची दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून (दि.18) ग्रामीण भागातील सर्व 21 दुय्यम निबंधक कार्यालये सुरू होणार असून, नागरिकांना सदनिका, दुकाने, जमीन आदींची खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदविता येणार आहे.
सहजिल्हा निबंधक, पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखाली सर्व 21 कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. बारामती तालुक्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2, क्रमांक-1 शिरुर-दुय्यम निबंधक कार्यालय शिरुर व तळेगाव ढमढेरे, दौंड-दुय्यम निबंधक कार्यालय दौंड व केडगाव, भोर-दुय्यम निबंधक कार्यालय भोर, वेल्हा-दुय्यम निबंधक कार्यालय वेल्हा, इंदापूर-दुय्यम निबंधक कार्यालय इंदापूर, जुन्नर-दुय्यम निबंधक कार्यालय जुन्नर व नारायणगाव, आंबेगाव-दुय्यम निबंधक कार्यालय आंबेगाव, पुरंदर-दुय्यम निबंधक कार्यालय पुरदंर, मुळशी- दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी 1 (पौड) व मुळशी 2 (हिंजवडी), वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे व लोणावळा, खेड-दुय्यम निबंधक कार्यालय, खेड 1, खेड 2 (चाकण), खेड 3 ही कार्यालये सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.