एच-1बी व्हिसासाठी 1 मार्चपासून नोंदणी सुरू

वॉशिंग्टन – अमेरिकेत कामाच्या निमित्ताने वास्तव्यासाठी आवश्यक असलेल्या “एच-1बी’ व्हिसासाठी 1 मार्चपासून नोंदणीला प्रारंभ होणार आहे. हा व्हिसा 2023 या आर्थिक वर्षासाठी असणार आहे. या व्हिसासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांची यादी 31 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती अमेरिकेच्या फेडरल इमिग्रेशन एजन्सीच्यावतीने देण्यात आली आहे.
1 मार्च पासून सुरू होणारी ही नोंदणी 18 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. एच-1 बी व्हिसासाठी तयार करण्यात आलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून या व्हिसाच्या कागदपत्रांची पुर्तता आणि आवश्यक अटींची पूर्तता केली जाऊ शकेल. 18 मार्चपर्यंत पुरेसे अर्ज आल्यास त्यापैकी निवडक अर्ज छाननीसाठी पाठवून देण्यात येणार आहेत. त्यातून अंतिम निवड झालेल्यांची यादी 31 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे, असे इमिग्रेशन सर्व्हिसेसच्यावतीने सांगण्यात आले आहे.
अमेरिकेच्या संसदेने मान्यता दिल्यामुसार दरवर्षी 65 हजार जणांना एच-1बी व्हिसा दिला जाऊ सकणार आहे. अमेरिकेतून उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या 20 हजार उमेदवारांनाही एचृ1 बी व्हिसा दिला जाऊ शकणार आहे.





