Reem Sheikh : टीव्ही अभिनेत्री रीम शेखने (Reem Sheikh) दुसऱ्या धर्मातील मुलासोबत लग्न करण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रीम सध्या सिंगल असून ती खूप धार्मिक असल्याचे तिने सांगितले. जर एखादा मुलगा दुसऱ्या धर्माचा असेल, तर ती त्याच्यासोबत जुळवून घेऊ शकणार नाही, असेही तिने स्पष्टपणे सांगितले. एका पॉडकास्टमध्ये रीम शेख (Reem Sheikh) म्हणाली की, ‘माझा माझ्या धर्मावर विश्वास आहे. मी दिवसातून पाच वेळा नमाज पठण करते. मी रमजानमध्ये उपवास करते. म्हणूनच मी दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करू शकत नाही. मी देवाची प्रार्थना करते आणि जेव्हा माझ्या आयुष्यात काही घडतं, तेव्हा मी त्याच्याकडे जाते.’ OPERATION SINDOOR: “पुरावा वाद घालत नाहीत, तर निर्णय देतात, फक्त २२ मिनिटांत…” ; ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा रीम पुढे म्हणाली, ‘जर एखादा मुलगा दुसऱ्या धर्माचा असेल, तर मी त्याच्यासोबत जुळवून घेऊ शकणार नाही. मला माहित आहे की, हे बोलल्याबद्दल मला शिव्या खाव्या लागतील. पण मी वेगळ्या धर्माच्या मुलासोबत राहू शकत नाही.’ Reem Sheikh आई-वडिलांचं आंतरधर्मीय लग्न (Reem Sheikh) रीमने सांगितलं की, तिच्या आई-वडिलांचं आंतरधर्मीय लग्न झालं होतं. रीमची आई शीतल हिंदू आहे आणि तिचे वडील मुस्लीम आहेत. रीम शेखच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला असून, त्यांच्याबाबत तिने सांगितले की, तिचं बालपण खूप दु:खात गेलं. तिने घरात अनेकदा हिंसा पाहिल्याने तिच्या मनात राग आणि भीतीची भावना होती. Reem Sheikh : “दुसऱ्या धर्माचा मुलगा असेल, तर…” रीम शेखने लग्नाबद्दल स्पष्ट केले मत दरम्यान, रीमच्या आईने घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं असून त्यांना एक मुलगी आहे. रीमचे तिच्या सावत्र बहिणीसोबत चांगले संबंध आहेत. Reem Sheikh रीम शेखचं करिअर (Reem Sheikh) रीमने वयाच्या ८व्या वर्षी ‘नीर भरे तेरे नैना देवी’ या शोमध्ये देवी लक्ष्मीची भूमिका साकारली होती. त्यानंतर रीमने ‘ना आना इस देस लाडो’, ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘देवों के देव…महादेव’, ‘दिया और बाती हम’ यांसारख्या मालिकेत काम केलं. तसेच ती ‘खतरा खतरा’, ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्येही दिसली होती. तिने ‘वजीर’, होमबाउंड’ या चित्रपटांमध्येही काम केलं. हेही वाचा: Japan Earthquake: शक्तिशाली भूकंपाने ‘हा’ देश हादरला ; दरड कोसळण्याचा अन् भूस्खलनाचा धोका