Pune : कांदा, शेवगा, टोमॅटो, फ्लॉवरच्या भावात घट

पुणे : तरकारी बाजारात राज्यासह परराज्यांतून येणारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्यापेक्षा काहीशी कमी झाली होती. मागणी अधिक असल्याने अवाक कमी झाल्याने गवार, भेंडी, काकडीच्या भावात घट झाली आहे, तर टोमॅटो, फ्लॉवर, कांदा आणि शेवग्याची अवाक वाढल्याने १०-१५ टक्क्यांनी भावात घट झाली आहे. इतर सर्वच प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर होते.
गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (ता. १५) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात आणि आंध्रप्रदेश येथून हिरवी मिरची ८ ते १० टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, कर्नाटकातून पावटा ३-४ टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा २-३ टेम्पो, राजस्थान येथून ९ ते १० ट्रक गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा २ ते ३ टेम्पो, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटकमधून १ टेम्पो, मध्यप्रदेशातून १८ ते २० ट्रक मटार, तामिळनाडूतून १ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्यप्रदेशातून लसूण सुमारे १० ते १२ टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ११ ते १२ हजार क्रेट, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, पावटा २-३, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो, कांदा सुमारे १२५ ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० टेम्पो आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : २५०-३३०, बटाटा : १७०- ३४०, लसूण : २१००- ३०००, आले सातारी: ३००-३५०, भेंडी : ४००-६००, गवार : ६००- ८००, टोमॅटो : १००-१५०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ३००-३५०, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : ३५०-४००, काकडी : ४००-५०० कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १५०-२००, पापडी : ३५०-४००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : १००- १५०, वांगी : १००-२००, डिंगरी : ४५०-५००, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी : ३५०-४००, जाड : २००-२२०, शेवगा : १३००-१७००, गाजर : २००-३००, वालवर : ३००-३५०, बीट : २००-३००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००- १५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ६००-६५००, मटार : परराज्य : ६००-७५०, पावटा : ४००-४५०, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : ९००-१०००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.
बोरांना मागणी वाढली
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात डाळिंब, मोसंबी, कलिंगड, खरबूज, पपई आणि जुन्या बहरातील मोसंबीच्या भावात काहीशी घट झाली आहे, तर बोरांच्या भावात ५-१० टक्क्यांनी वाढ झाली. पेरू, सीताफळ, अननस, चिक्कू, संत्री आणि नवीन बहरातील मोसंबीचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी (ता. १५) फळबाजारात जुन्या आणि नवीन बहरातील मोसंबी ४० टन, संत्री ७०-८० टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई ३० ते ४० टन , पेरू तीन ते चार टेम्पो, लिंबांची सुमारे दोन हजार गोणी, कलिंगड ७० ते ८० टन, खरबूज ३ ते ४ टेम्पो, चिक्कू एक हजार बॉक्स, अननस ५ ट्रक, सीताफळ १० ते १५ टन, बोरांची ७०० गोणी एवढी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे
लिंबे (प्रतिगोणी) : ४००-६००, जुना बहार मोसंबी : (३ डझन) : १५०-४५०, (४ डझन) : १५०-२५०, नवीन बहार मोसंबी (३ डझन) : ८०-१५०, (४ डझन) : ४०-८०, संत्री : (१० किलो) : २००-५००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ७०-२५०, आरक्ता : २०-७०, गणेश : १०-३०, कलिंगड : ८-१२, खरबूज : १५-३८, पपई : ८-१५, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरू (१० किलो) : १००-३००, सीताफळ १० -१००, अननस (१ डझन): १००-६००, बोरे (१० किलो) चमेली : २५०-३०० उमराण : ८०-१२०, चेकनट : ७००-९००, चण्यामण्या: ८००-१००
लग्नतारखांमुळे शोभिवंत फुलांना मागणी
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : ५०-१००, अॅष्टर : जुडी १५-२५, सुट्टा ६०-१२०, कापरी : १०-३०, शेवंती : २०-५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : ५० -१२०, डच गुलाब (२० नग) : ८० -२००, जर्बेरा : ५०-८०, कार्नेशियन : २००- ३००, शेवंती काडी : २००- ३००, लिलियम (१० काड्या) ८००-१२००, ऑर्चिड ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१२०, जिप्सोफिला : २००-४५०.





