Pune rains : दोन दिवसात राज्यात मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात हवामान विभागाने जिल्ह्यांना अलर्ट जारी केले आहेत. यामध्ये पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात भारतीय हवामान विभागाकडून 16 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याला रेड अलर्ट तर विदर्भात अॅारेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. इतर ठिकाणी थेट येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये विजेंच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. घाटमाथ्यावर जोरदार बरसरण्याची शक्यता पुढील तीन दिवस शहरासह घाटमाध्यावर मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. कमाल व किमान तापमानातही नेहमीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी घट झाली आहे. शहर आणि परिसरात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मंगळवारपासून जोर कमी होणार? पुढील दोन ते तीन दिवसांत आकाश सामान्यतः ढगाळ राहून शहरात हलक्या स्वरूपाचा, तर घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा! मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड येथे पावसाची संतधार सुरू असून आज पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंंबईमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना नागरिकांना भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. हेही वाचा : Sharad Pawar : ‘वसंतदादांचे सरकार मीच पाडलं’; शरद पवारांनी उलगडला जुन्या राजकारणाचा अध्याय