कलम 370 हटवल्यानंतर बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात विक्रमी मतदान; PM मोदींनी मानले जनतेचे आभार

Lok Sabha Election 2024| जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला लोकसभा मतदार संघात २० मे रोजी मतदान पार पडले. येथे सर्वाधिक ५९ टक्के मतदान झाले, जे १९८४ नंतरचे सर्वाधिक आहे. त्याचवेळी सोपोर विधानसभा मतदारसंघात ४४.३६ टक्के मतदान झाले. काही दशकांत ही टक्केवारी १० टक्क्यांपेक्षा कमी राहिली होती. जे आताची मतदानाची आकडेवारी पाहता हे उल्लेखनीय आहे. केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य निवडणूक अधिकारी पी. के. पोलने ही माहिती दिली.
PM मोदींनी मानले आभार
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंतच्या सर्वाधिक मतदानाबद्दल बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आभार मानले आहेत. जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या बारामुल्लामधील विक्रमी मतदानाची पोस्ट रिट्वीट करत पीएम मोदींनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले, “मतदानासाठी असा सक्रिय सहभाग हा एक उत्तम ट्रेंड आहे. बारामुल्लाच्या माझ्या बहिणी आणि बांधवांचे लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या अतूट बांधिलकीबद्दल अभिनंदन.”
Compliments to my sisters and brothers of Baramulla for their unbreakable commitment to democratic values. Such active participation is a great trend. https://t.co/388iFHEQd3
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2024
बारामुल्लामध्ये मतदानाचा विक्रम मोडला Lok Sabha Election 2024|
मतदान पूर्ण झाल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, १९६७ मध्ये पहिल्यांदा झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात यावेळी विक्रमी मतदान झाले आहे. १९८४ मध्ये बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात यापूर्वी सर्वाधिक ५८.९० टक्के मतदान झाले होते. यावेळी ही टक्केवारी ५९ असल्याचे पोलने यांनी म्हटले आहे. या लोकसभा जागेवर एकूण १७,३७,८६५ मतदार होते. बारामुल्ला मतदारसंघातील २१०३ मतदान केंद्रांवर मतदान झाले, ज्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
संपूर्ण मतदारसंघात सकाळी सात वाजण्यापूर्वीच मतदानासाठी रांगा लागायला सुरुवात झाली होती.
२०१९ मध्ये येथे ३४.६ टक्के मतदान झाले होते, तर १९८९ मध्ये ते केवळ ५.४८ टक्के होते. यावेळी बारामुल्ला मतदारसंघातून २२ उमेदवार रिंगणात आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला, पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद गनी लोन आणि अपक्ष म्हणून शेख अब्दुल रशीद उर्फ इंजिनियर रशीद हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. रशीद सध्या तुरुंगात आहे.
कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिली निवडणूक Lok Sabha Election 2024|
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात श्रीनगर मतदारसंघात ३९.४९ टक्के मतदान झाले होते, जे १९९६ नंतरचे सर्वाधिक आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर खोऱ्यातील ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसर १९८९ पासून दहशतवादाच्या विळख्यात आहे. त्यामुळे मतदानाने आतापर्यंतचा नीचांकी ५.५ टक्के इतका टप्पा गाठला होता. १९९० च्या दशकात उत्तर काश्मीर हा दहशतवाद्यांचा बालेकिल्ला होता.
हेही वाचा:
“अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा 100 % प्रचार केला नाही” ; मतदानानंतर श्रीरंग बारणे स्पष्टच बोलले





