बंगळूरु: उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने मुगलसराय स्टेशनचे नामकरण दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाने केल्यानंतर आता याच धर्तीवर कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने चार महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. काँग्रेस सरकारने स्थानिक सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व जपण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. संतांच्या नावाने होणार स्थानके – कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी गुरुवारी (आज) एक निवेदन जारी करत ही माहिती दिली. त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात विजयपुरा (विजापूर), बेळगावी (बेळगाव), बिदर आणि शिवमोगा (सोरागोंडानाकोप्पा) या रेल्वे स्थानकांची नावे प्रमुख लिंगायत संतांच्या नावावर ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. बदल प्रस्तावित असलेली रेल्वे स्थानके: सध्याचे नाव प्रस्तावित नवीन नाव विजयपुरा रेल्वे स्टेशन ज्ञान योगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी रेल्वे स्टेशन बेळगावी रेल्वे स्टेशन श्री बसव महास्वामीजी रेल्वे स्टेशन बिदर रेल्वे स्टेशन चन्नाबसव पट्टादेवरू रेल्वे स्टेशन सोरागोंडानाकोप्पा स्टेशन भयगड़ा रेल्वे स्टेशन केंद्र सरकारकडे तातडीच्या मंजुरीची मागणी – ही सर्व चार रेल्वे स्थानके दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागांतर्गत येतात. एम. बी. पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकारने संतांनी कर्नाटकच्या विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा आदर करण्यासाठी हा प्रस्ताव तयार केला आहे. या नामांतरासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे. त्यानुसार, पायाभूत सुविधा विभागाने (Infrastructure Department) अधिकृत सूचना पाठवली आहे. मंत्री पाटील यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे की, या नामांतराला तातडीने मंजुरी द्यावी आणि लवकरत लवकर अधिकृत राजपत्रामध्ये (Official Gazette) याची अधिसूचना (Notify) जारी करावी.