थायलंडमध्ये समलिंगी विवाहांना मान्यता
Updated On:

बँकॉक : थायलंडमध्ये समलिंगी विवाहांना मान्यता देणारा कायदा संमत झाला आहे. राजा महा वजिरालोंगकॉर्न यांनी मंगळवारी मंजूरी दिल्यानंतर आता समलिंगी विवाह कायदा अस्तित्वात आलाआहे. त्यामुळे अशा समलिंगी जोडप्यांना विवाह करता येणार आहे. हा कायदा पुढील वर्षी म्हणजेच 22 जानेवारी 2025 पासून देशात लागू होणार आहे.
कायद्याच्या अंमलबजावणीनंतर देशातील कोणतेही समलिंगी जोडपे कायदेशीररित्या त्यांच्या विवाहाची नोंदणी करू शकतात. थायलंड आता समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आशियातील तिसरा आणि आग्नेय आशियातील पहिला देश बनला आहे.





