Narendra Modi : 10 वर्षांपूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईकची काढली आठवण; आता PM मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा म्हणाले…
Narendra Modi : दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला करण्याचे धाडस केल्यास त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Prime Minister Narendra Modi’s Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित केले. या कार्यक्रमाच्या १३८ व्या भागात पंतप्रधानांनी १० वर्षांपूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करत दहशतवाद खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा पाकिस्तानला दिला आहे.
दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला करण्याचे धाडस केल्यास त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “२८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला. आपल्या शूर सैनिकांनी नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग थक्क झाले. या कारवाईने भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचे एक नवे उदाहरण जगासमोर ठेवले.”
गेल्या दशकात बालाकोट हवाई हल्ल्यापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत भारताने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. आज भारत दहशतवादाविरोधात ‘शून्य-सहिष्णुता’ धोरण स्वीकारून पुढे जात असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच जर दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला करण्याचे धाडस केले, तर त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असेही मोदी म्हणाले.
मोदींनी केलेल्या दाव्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता
‘मन की बात’च्या सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केला ते म्हणाले की, “देशाच्या ऐतिहासिक कामगिरीपैकी एका महत्त्वाच्या घटनेला आता १० वर्षे पूर्ण होत आहेत. पूर्वी देशावर दहशतवादी हल्ले झाल्यानंतर पाकिस्तानविरोधात कारवाईची मागणी होत असे. मात्र, त्यावेळी भारताकडून केवळ संयमाने परिस्थितीचा सामना केला जात असल्याचा गंंभीर आरोपही मोदींनी केला आहे. त्यानंतरच्या काळात भारताने दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याच्या धोरणात बदल केल्याचे मोदींनी नमूद केले. त्यांच्या या दाव्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Eknath Shinde: “देशाच्या जनतेची माफी मागावी”; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल





