Realme P4R5G: 8000mAh बॅटरीसह Realme P4R 5G लॉन्च; एकदा चार्ज केल्यावर 3 दिवसांची साथ!
Realme P4R5G फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय रिव्हर्स चार्जिंगची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे गरज पडल्यास या फोनद्वारे इतर डिव्हाइसेसही चार्ज करता येतील.

Realme P4R5G: स्मार्टफोन बाजारात रिअलमीने आणखी एक दमदार फोन लॉन्च केला आहे. कंपनीने आपला नवीन Realme P4R 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला असून, मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंग, AI फीचर्स आणि आकर्षक किंमत यामुळे हा फोन चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे हा फोन रिअलमीच्या P सिरीजचा भाग आहे. ही सिरीज प्रामुख्याने बॅटरी-केंद्रित स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. (Realme P4R5G)
या नव्या फोनमध्ये तब्बल 8000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बॅटरी तब्बल तीन दिवसांचा बॅकअप देऊ शकते. त्यामुळे सतत चार्जिंगची चिंता करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो.
फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय रिव्हर्स चार्जिंगची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे गरज पडल्यास या फोनद्वारे इतर डिव्हाइसेसही चार्ज करता येतील. (Realme P4R5G)
परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झाल्यास, Realme P4R 5G मध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. दैनंदिन कामे, सोशल मीडिया वापर, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि गेमिंगसाठी हा प्रोसेसर सक्षम मानला जातो.
फोनमध्ये डायनॅमिक रॅम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे वापरकर्त्यांना 14GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमचा अनुभव मिळतो. त्यामुळे मल्टीटास्किंग अधिक सहज होते आणि अनेक अॅप्स एकाच वेळी वापरताना फोनचा वेग कायम राहतो. (Realme P4R5G)

Realme P4R5G: 8000mAh बॅटरीसह Realme P4R 5G लॉन्च; एकदा चार्ज केल्यावर 3 दिवसांची साथ!
डिस्प्लेच्या बाबतीतही कंपनीने चांगली वैशिष्ट्ये दिली आहेत. या फोनमध्ये 6.8 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे. स्क्रीनला 1200 निट्स पीक ब्राइटनेस आणि 144Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. त्यामुळे गेमिंग, व्हिडिओ पाहणे किंवा सोशल मीडिया स्क्रोलिंग करताना अधिक स्मूथ अनुभव मिळतो.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. ( Realme P4R5G)
याशिवाय फोनमध्ये अनेक AI फीचर्सही देण्यात आले आहेत. AI Eraser 2.0, AI Ultra Clarity, AI Unblur आणि AI Portrait Glow यांसारख्या फीचर्समुळे फोटो एडिटिंग आणि इमेज क्वालिटी सुधारण्यास मदत होते. (Realme P4R5G)
फोनला IP65 रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे धूळ आणि पाण्याच्या हलक्या शिंतोड्यांपासून फोनचे संरक्षण होते. तसेच फोन थंड ठेवण्यासाठी Airflow VC Cooling System देण्यात आली आहे.
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. 6GB RAM + 128GB व्हेरिएंट 20,999 रुपयांना तर 6GB RAM + 256GB व्हेरिएंट 22,999 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र लॉन्च ऑफरअंतर्गत हे फोन अनुक्रमे 16,999 रुपये, 18,999 रुपये आणि 20,999 रुपयांच्या विशेष किमतीत खरेदी करता येतील. (Realme P4R5G)
20 ते 25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी Realme P4R 5G हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो. मोठी बॅटरी, AI फीचर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्समुळे हा फोन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.





