Realme 16T: स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. रिअलमी कंपनी आपला नवीन स्मार्टफोन ‘रिअलमी १६टी’ भारतात २२ मे २०२६ रोजी लॉन्च करणार आहे. लॉन्चपूर्वीच या फोनबाबत अनेक माहिती आणि फीचर्स लीक झाले आहेत. विशेष म्हणजे, या फोनची बॅटरी आणि किंमत यामुळे तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, ‘रिअलमी १६टी’च्या रिटेल बॉक्सवर तब्बल ५५,९९९ रुपये एमआरपी दिसत आहे. मात्र, प्रत्यक्ष विक्री किंमत यापेक्षा खूप कमी असण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, हा फोन भारतात २० हजार ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान लॉन्च होऊ शकतो. (Realme 16T) या स्मार्टफोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याची दमदार ८,०००mAh बॅटरी. कंपनीचा दावा आहे की, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा फोन तब्बल तीन दिवस सहज चालू शकतो. त्यामुळे सतत चार्जर घेऊन फिरण्याची गरज पडणार नाही. गेमिंग करणाऱ्यांसाठीही हा फोन खास ठरू शकतो. कंपनीनुसार, या फोनवर सलग ११ तास BGMI गेम ६०fps वर खेळता येणार आहे. (Realme 16T) इतकी मोठी बॅटरी असूनही कंपनीने फोनचा डिझाइन स्लिम ठेवला आहे. या फोनची जाडी फक्त ८.८ मिमी आहे. तसेच फोनमध्ये ४५W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. त्यामुळे मोठी बॅटरी कमी वेळेत चार्ज होण्यास मदत होणार आहे. परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर, ‘रिअलमी १६टी’मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर देण्यात आला आहे. रोजच्या वापरासाठी, सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि नॉर्मल गेमिंगसाठी हा प्रोसेसर चांगला मानला जातो. फोनमध्ये ८GB रॅम मिळणार असून, रॅम बूस्ट फीचरच्या मदतीने ती १०GB पर्यंत वाढवता येणार आहे. realme 16t 5g to launch in india on may 22 with 8000mah battery डिस्प्लेबाबत सांगायचे झाल्यास, या फोनमध्ये ६.८ इंचाचा मोठा LCD डिस्प्ले दिला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी आणि गेमिंगसाठी हा मोठा स्क्रीन चांगला अनुभव देऊ शकतो. मात्र, यात AMOLED डिस्प्लेसारखे गडद आणि चमकदार रंग मिळणार नाहीत. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५०MP + २MP असा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. कंपनीने Sony IMX852 सेन्सर आणि AI फीचर्सही दिले आहेत. कमी प्रकाशातही चांगले फोटो घेण्यासाठी ‘AI Portrait Glow’ आणि ‘LumaColor Image Engine’ सारखी फीचर्स यात असतील. (Realme 16T) याशिवाय फोनमध्ये रिअर सेल्फी मिररही देण्यात आला आहे. त्यामुळे मागच्या कॅमेराने फोटो काढताना स्वतःला सहज पाहता येणार आहे. कंपनी फोनचे ६GB + १२८GB, ८GB + १२८GB आणि ८GB + २५६GB असे तीन व्हेरिएंट लॉन्च करू शकते. एकूणच, दमदार बॅटरी, AI कॅमेरा आणि आकर्षक किंमत यामुळे ‘रिअलमी १६टी’ हा मिड-रेंज सेगमेंटमधील एक दमदार पर्याय ठरू शकतो.