Rahul Gandhi – केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानत नवीन सरकारचे स्वागत केले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केरळमध्ये आता खऱ्या कामाला सुरुवात झाली आहे, असे म्हटले आहे, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या राज्यात आता खऱ्या प्रगतीचा अनुभव येईल, अशी आशा व्यक्त केली आहे. शपथविधी सोहळ्यानंतर सोशल मीडिया अकाउंटवरवर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले, केरळच्या जनतेने या सरकारसाठी मोठा लढा दिला आहे आणि जनतेचा हाच आवाज आता सरकारला दिशा देईल. (Rahul Gandhi) मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन् आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन, जे आता प्रत्येक केरळीय नागरिकाच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करतील. Rahul Gandhi : “केरळमध्ये आता खऱ्या कामाला सुरुवात’; राहुल गांधींनी दिल्या नव्या सरकारला शुभेच्छा ! या मोहिमेचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल त्यांनी के. सी. वेणुगोपाल यांचे आभार मानले, तसेच हा विजय युडीएफच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि डिजिटल वॉरियरचा असल्याचे सांगत त्यांच्या त्यागाचा गौरव केला. (Rahul Gandhi) दुसऱ्या बाजूला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्ही. डी. सतीशन् यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला. ते म्हणाले की, काँग्रेस-युडीएफच्या सामूहिक नेतृत्वाखाली केरळमध्ये आता सर्वसमावेशक आणि भविष्यवेधी विकासाचे नवे पर्व सुरू होईल. सन्मान, न्याय, स्वातंत्र्य आणि सलोखा हेच आमच्या वचनबद्धतेचे मुख्य आधारस्तंभ राहतील. खर्गे आणि गांधी या दोघांनीही तिरुअनंतपुरम येथील शपथविधी समारंभाला प्रत्यक्ष उपस्थिती लावली होती.