मुंबई – पिंक, बेबी आणि नाम शबाना या सारख्या चित्रपटांमध्ये तिने धाडसी भूमिका साकारलेली अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या व्यक्तिगत आयुष्यातही बेधडक,बिनधास्त आणि सडेतोड वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे.
यातच एका कार्यक्रमात तापसलीला विचारण्यात आले की, ‘वाईट सेक्स आणि खूप सारं प्रेम किंवा चांगला सेक्स आणि अजिबात प्रेम नाही. या दोघांमधून तू काय निवडशील?’ यावर ती म्हणाली, ‘माझ्यासाठी सेक्स आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम असेल तर सेक्स चांगलाच होईल. नाही तर माझ्याकडून ते होणार नाही. याबाबतीत तुम्ही मला ओल्ड स्कुल म्हणाला तरी चालेल’, असं तापसी म्हणाली आहे.
दरम्यान, मिशन मंगल आणि “सांड की आंख’ या लागोपाठ हिट झालेल्या सिनेमांनंतर तापसी पन्नू आता भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन मिताली राजच्या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी तयारी करते आहे.
तसेच “सिया-जिया’ चित्रपटात डबल रोल साकारणार आहे. या चित्रपटाला प्रसिद्ध दिग्दर्शन संजय लीला भंसाली हे प्रड्यूस करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी करण्यात येणार आहे.