अत्याचार पिडित महिलेवर पुन्हा अत्याचार

पिंपरी – आपल्यावर झालेल्या अत्याचाराची फिर्याद महिलेने दिली. ही फिर्याद मागे घ्यावी यासाठी आरोपीने त्या महिलेवर चाकूचा धाक दाखवून पुन्हा अत्याचार केला. ही घटना वाकड येथे घडली.

आबा मधुकर बर्फे (वय 36, रा. गणेश कॉलनी, भोसरी) असे दुसऱ्यांदा बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 37 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारी 2018 रोजी दिघी पोलीस ठाण्यात पिडित महिलेने आरोपीच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दिली होती. ही फिर्याद मागे घ्यावी, यासाठी आरोपी आबा हा वेळोवेळी पिडित महिलेचा पाठलाग करीत होता.

3 ऑगस्ट रोजी आरोपीने पिडीत महिलेचा चाकूचा धाक दाखवून तिला रिक्षातून वाकड येथील लॉजवर जबरदस्तीने नेले. तिथे तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

बापाने केला मुलीचा विनयभंग

जन्मदात्या पित्यानेच आपल्या 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केला. ही घटना दिघी येथे सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिडित मुलीच्या 35 वर्षीय आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक कुरेवाड याबाबत अधिक तपास करीत आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.