दिशाच्या चारही आरोपींचे पुन्हा शवविच्छेदन
Updated On:

मृतदेह साधारणत: 50 टक्के कुजले
शवविच्छेदनाचा व्हिडिओ काढा
अहवाल सोमवारी पाच वाजेपर्यंत द्या
हैदराबाद : दिशा बलात्कार प्रकरणातील चकमकीत मारल्या गेलेल्या चारही आरोपींचे शवविच्छेदन पुन्हा करण्याचे आदेश तेलंगणा उच्च न्यायलयाने दिले.
शवविच्छेदनाच्या ध्वनीचित्रफितीसह शवविच्छेदन अहवाल सोमवारी दुपारी पाच वाजेपर्यंत द्यावा. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत त्यांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात द्यावेत. पुरावे सीलबंद अवस्थेत जतन करावेत, असे आदेश न्यालयाने दिले.
गांधी रुग्णालयाचे अधिक्षक श्रावण यांनी सांगितले की, सात दिवसानंतर मृतदेह पूर्णपणे कुजून जातील. आता पर्यंत हे मृतदेह 50 टक्के कुजले आहेत. त्यांच्या या निवेदनानंतर न्यायलयाने हा निर्णय दिला.





