पाथर्डी -तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे मुंबईहून आलेल्या एका पोलीसाला करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा करोनाने शिरकाव केला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली.
मुंबई येथील कळंबोली सेंटरमधून तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे 1 जून रोजी संबंधित 48 वर्षीय पोलीस व्यक्ती आली होती. त्रास जाणवल्यानंतर संबंधित व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी सांयकाळी संबंधित पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती कळताच तालुका आरोग्य विभागाने चिंचपूर इजदे येथे जावून बाधित रुग्णाच्या संपर्कातील संशयितांना ताब्यात घेण्याचे काम चालू केले होते.