\n\nYou can put your faith in him when its a run chase 🙌
\nVirat Kohli reaches another #TATAIPL fifty 👏
\nUpdates ▶️ https://t.co/5ZJjfv5Nr6#KhelBindaas | #RCBvGT pic.twitter.com/zJlUA70Udp
\n— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2026
\nप्रत्युत्तरात २०६ धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात तशी संथ होती. पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीचा एक सोपा झेल वॉशिंग्टन सुंदरने सोडला. हे जीवदान गुजरातला प्रचंड महागात पडले. त्यानंतर विराट आणि पडिक्कलने गुजरातच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. या दोघांनी अवघ्या ४७ चेंडूत शतकीय भागीदारी रचली आणि ९ षटकांतच आरसीबीला १०० धावांच्या पार नेले. पडिक्कलने केवळ २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर विराटने ३० चेंडूत पन्नास धावांचा टप्पा ओलांडला.
\n\n📸 𝗛𝗶𝘀 𝗺𝗼𝗺𝗲𝗻𝘁! 🤩
\nSai Sudharsan walks back after a magnificent 1⃣0⃣0⃣(58) 👏
\nUpdates ▶️ https://t.co/5ZJjfv5Nr6#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvGT pic.twitter.com/7FmeLETNKr
\n— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2026
\nतत्पूर्वी, गुजरात टायटन्सकडून फलंदाजी करताना साई सुदर्शनने ५८ चेंडूत १०० धावांची शानदार शतकी खेळी केली. याच सामन्यात त्याने सर्वात वेगवान २००० आयपीएल धावांचा ख्रिस गेलचा विक्रमही मोडीत काढला. मात्र, कोहली-पडिक्कल जोडीच्या वादळापुढे सुदर्शनचे हे शतक फिके पडले. या विजयासह आरसीबीचे १० गुण झाले असून त्यांनी राजस्थान रॉयल्सला मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.