RCB vs DC : आयपीएल २०२६ स्पर्धेतील २६व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीवर (RCB vs DC) ६ विकेट्स राखून चित्त थरारक विजय मिळवला. खरं तर हा सामना आरसीबीला जिंकण्यासारखा वाटत होता, पण शेवटच्या षटकात १५ धावा रोखण्यात आरसीबीच्या गोलंदाजांना अपयश आले. दिल्लीने १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग १९.५ षटकात ४ गडी गमावून पूर्ण केला. या विजयासह (RCB vs DC) दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवला. नाणेफेक आणि सामन्याची सुरुवात नाणेफेक जिंकलेल्या दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याला हा निर्णय मनासारखा होता आणि त्याने तसे बोलूनही दाखवले. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकात ८ गडी गमावून १७५ धावा केल्या आणि दिल्लीसमोर १७६ धावांचे आव्हान ठेवले. RCB vs DC आरसीबीचा डाव आरसीबीने (RCB vs DC) सावध सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली यांनी ५२ धावांची भागीदारी रचली. विराट कोहली १३ चेंडूत १९ धावा करून बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कलही फार काही करू शकला नाही आणि १८ धावांवर माघारी परतला. एक बाजू सॉल्टने सावरली, तर दुसऱ्या बाजूला विकेट्सची रांग लागली. रजत पाटीदार ८, टिम डेविड २६, जितेश शर्मा १४, रोमारियो शेफर्ड १ आणि कृणाल पांड्या १२ धावांवर बाद झाले. मात्र, फिलिप सॉल्टने ३८ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ६३ धावांची आक्रमक खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सचा डाव दिल्लीला पहिल्याच षटकात धक्का बसला. पाथुम निस्संका केवळ १ धाव करून भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. करूण नायर ५ धावांवर आणि समीर रिझवी ३ चेंडूत २ धावांवर बाद झाला. भुवनेश्वर कुमारने सुरुवातीला तीन विकेट्स घेत दिल्लीला मोठा धक्का दिला. मात्र, केएल राहुलने ३४ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. अक्षर पटेल (कर्णधार) १९ चेंडूत २६ धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. शेवटच्या टप्प्यात ट्रिस्टन स्टब्स (६०*) आणि डेव्हिड मिलर (२२*) यांनी आक्रमक खेळी करून दिल्लीला विजय मिळवून दिला. दिल्लीने १९.५ षटकात १७९/४ धावा केल्या आणि सामना ६ गडी राखून जिंकला.