एकीकडे सामना जिंकल्याचा आनंद, दुसरीकडे बहिणीचे निधन; RCBच्या ‘या’ स्टार क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर

मुंबई – क्रिकेट क्षेत्रातून दु:खद बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. सामना संपल्यानंतर हर्षलला तातडीने घरी जावे लागले आहे. त्यामुळे एकीकडे सामना जिंकल्याचा आनंद तर दुसरीकडे बहिणीच्या निधनाचे दु:ख अशी दुहेरी अवस्था क्रिकेटपटू हर्षलची झाली आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगाम सुरु झाला आहे. बंगळुरू विरुद्ध मुंबई सामना नुकताच झाला या सामन्यात बंगळुरू मुंबईचा पराभव केला आहे. याच दरम्यान बंगळुरू टीमचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचे निधन झाल्याचे समजले. तेव्हा एकीकडे आनंद तर दुसरीकडे दु:ख असी अवस्था हर्षलची झाली. सामना संपल्यानंतर मॅनेजमेंटने तातडीनं त्याची घरी जाण्याची व्यवस्थाही केली. दरम्यान हर्षलला पुन्हा आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी बायोबबल आणि क्वारंटाइनच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.





