जागतिक व्यापार युद्धादरम्यान RBIच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू
Updated On:

मुंबई – जागतिक व्यापार युद्ध, मंदीची शक्यता या पार्श्वभूमीवर रिझव्हर्र् बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सोमवारी सुरू झाली. बुधवारी पतधोरण जाहीर होणार आहे. गेल्या आठवड्यात बँक व्याजदरात पाव टक्के कपात करील असे गृहीत धरले जात होते. मात्र दरम्यानच्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न भूतो न भविष्यती व्यापार शुल्क बहुतांश देशावर लावले आहे. अमेरिकेसह विविध देशात मंदी निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेला सर्व बाबींचा विचार करून व्याजदर ठरवावे लागणार आहेत. मात्र अजूनही बर्याच विश्लेषकांना व्याजदरात कपात होईल असे वाटते.



