RBI Repo Rate । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) रेपो दर ० .२५ टक्क्यांची कमी करून ५.२५% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली. या घोषणेसह, रेपो दर आता ५.५% वरून ५.२५% पर्यंत कमी झाला आहे. रेपो दरातील कपातीमुळे कर्जे स्वस्त होतील, ज्यामुळे EMI खर्च कमी होईल आणि बचतीला प्रोत्साहन मिळेल. यापूर्वी, MPC ची १ ऑक्टोबर रोजी बैठक झाली होती, जिथे रिझर्व्ह बँकेने रेपो दर ५.५% वर अपरिवर्तित ठेवला होता. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने आता सरकारी आणि खासगी बॅकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या दरात कपात केली जाऊ शकते. त्यामुळे सामान्य लोकांचा गृहकर्जाचा आणि वाहन कर्जाच्या मासिक हप्त्याची रक्कम घटण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. RBI Repo Rate । यंदाच्या वर्षात आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये एकूण तीनवेळा कपात केली होती. त्यामुळे रेपो रेट 1 टक्क्याने खाली आला होता. यामध्ये आता आणखी 0.25 बेसिस पॉईंटची भर पडली आहे. फेब्रुवारीच्या बैठकीत आरबीआयने रेपो रेट 6.50 वरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी केले होते. चलनविषयक धोरण समितीने ही कपात जवळजवळ पाच वर्षांनी केली होती. दुसऱ्यांदा, एप्रिलच्या बैठकीत व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करण्यात आला. तिसऱ्यांदा, जूनमध्ये रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आला होता. त्यानंतर आता रेपो रेटमध्ये आणखी 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.RBI Repo Rate ।