RBI MPC Meeting । आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची दोन दिवसांची बैठक आज संपणार आहे. यानंतर, कार आणि गृहकर्जांवर आरबीआयकडून नागरिकांना मोठी भेट मिळ्ण्याशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरबीआय रेपो दरात २५ ते ५० बेसिस पॉइंट्सची कपात करणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. जर असे झाले तर कर्जावर ईएमआय भरणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. यापूर्वी, एसबीआयने आपल्या अहवालात म्हटले होते की आरबीआय रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट्सपर्यंत कपात शक्य आहे. मात्र, काही अहवालात आरबीआय सध्या दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करू शकते आणि त्यानंतर पुढील चलनविषयक धोरण बैठकीत आणखी २५ बेसिस पॉइंट्सची सवलत दिली जाऊ शकते. आज आरबीआयकडून मिळणार मोठा दिलासा RBI MPC Meeting । यावर आज सकाळी १० वाजता आरबीआय निर्णय घेणार आहे. यामध्ये रेपो रेट, जीडीपी अंदाज आणि महागाई यावर निर्णय घेतले जाणार आहेत. यापूर्वी आरबीआयने रेपो दरात सलग दोनदा २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली होती, प्रथम फेब्रुवारीमध्ये आणि नंतर एप्रिलमध्ये, त्यानंतर तो आता ६ टक्क्यांवर कायम आहे. आता जर आरबीआयने रेपो दरात २५ किंवा ५० बेसिस पॉइंट्सची कपात केली तर तो ५.७५ किंवा ५.५० टक्क्यांपर्यंत खाली येईल. म्हणजेच, यानंतर, लोकांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज देखील त्यानुसार वजा केले जाईल. रेपो रेट म्हणजे काय? RBI MPC Meeting । प्रत्यक्षात, रेपो रेट म्हणजे आरबीआय बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर. अशा परिस्थितीत, जर आरबीआयने रेपो दरात बदल केला तर त्याचा थेट परिणाम बँक कर्जावर होतो. जर आरबीआयने रेपो दर वाढवला तर बँक कर्जावरील व्याज वाढवेल, ज्यामुळे कार आणि गृहकर्ज आणि त्यावरील ईएमआय महाग होईल आणि जेव्हा ते कमी करेल तेव्हा बँकेकडून लोकांना दिलासा दिला जातो.