RBI Action: ग्राहक पडताळणी (KYC) नियमांचे पालन न केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) YES बँकेवर 31.80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच ‘गव्हर्नन्स’ संदर्भातील निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेडवर 1.80 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. आरबीआयने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, YES बँकेने ग्राहकांशी खातेआधारित संबंध प्रस्थापित करताना सेंट्रल केवायसी रेकॉर्ड्स रजिस्ट्रीकडून (CKYCR) दिल्या जाणाऱ्या KYC आयडेंटिफायरचा वापर करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित केली नव्हती. त्यामुळे ‘नो युवर कस्टमर’ (KYC) संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. हेही वाचा – एसबीआयच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची घसरण; बाजारमूल्यात 66691 कोटींची घट बँकेच्या 31 मार्च 2025 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या आधारे आरबीआयने वैधानिक तपासणी आणि पर्यवेक्षण मूल्यांकन केले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने ‘गव्हर्नन्स’ संदर्भातील काही निर्देशांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीवर 1.80 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले. हेही वाचा – महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात; प्रतिक्विंटल 1500 रुपयांच्या अनुदानाची मागणी ग्राहकांवर काय परिणाम होणार? आरबीआयने लावलेला हा दंड प्रामुख्याने नियमभंग आणि अंतर्गत कार्यपद्धतीतील त्रुटींमुळे आहे. त्यामुळे YES बँक किंवा हिंदुजा हाऊसिंग फायनान्सच्या ग्राहकांवर थेट आर्थिक परिणाम होणार नाही. म्हणजेच, ग्राहकांच्या ठेवी, कर्ज व्यवहार किंवा दैनंदिन बँकिंग सेवा यावर तात्काळ कोणताही परिणाम होणार नाही. बँकेचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील. हेही वाचा – ‘या’ कारणामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 516, निफ्टीत 150 अंकांची घसरण मात्र, अशा कारवाईमुळे संबंधित वित्तीय संस्थांना केवायसी, ग्राहक पडताळणी आणि अंतर्गत नियंत्रण व्यवस्था अधिक कडक करावी लागते. त्यामुळे पुढील काळात ग्राहकांकडून कागदपत्रांची पडताळणी, अपडेटेड माहिती किंवा अतिरिक्त माहिती मागितली जाऊ शकते. आरबीआयनेही स्पष्ट केले आहे की, ही कारवाई नियमपालनातील त्रुटींशी संबंधित असून ग्राहकांच्या व्यवहारांच्या वैधतेवर कोणताही परिणाम होणार नाही.