रिझर्व्ह बँकेची आणखी एका कंपनीवर कारवाई; नवीन गोल्ड लोन देण्यावर घातली बंदी

RBI Action On IIFL Finance Gold Loan| रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी पेटीएम पेमेंट बँकेच्या बँकिंग व्यवसायावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर RBIने आणखी एका कंपनीवर कडक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आयआयएफएल फायनान्सला नवीन सुवर्ण कर्ज देण्यास बंदी घातली आहे.
आरबीआयने सोमवारी एक आदेश जारी करून बिगर बँकिंग फायनान्स कंपनी IIFL फायनान्सला नवीन सोने कर्ज देण्यापासून रोखले आहे. मात्र आधीच जारी केलेली सुवर्ण कर्जे सुरू राहतील. तसेच उर्वरित सेवाही सुरू राहणार आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, आयआयएफएल फायनान्स कर्ज वितरण आणि वसुली दरम्यान नियमांपेक्षा जास्त रोखे वापरत आहे. याशिवाय ग्राहकांवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही पारदर्शकता ठेवली जात नव्हती.
बंदी का घातली? RBI Action On IIFL Finance Gold Loan|
31 मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या आर्थिक स्थितीच्या तपासणीदरम्यान गोल्ड लोन वितरणामध्ये अनियमितता आढळून आल्याचे आआरबीआयकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये सोन्याच्या लिलावाच्या वेळी कर्जाची मान्यता, त्यासाठी लागणारा वेळ आणि चूक झाल्यास सोन्याची शुद्धता आणि वजन तपासणे आणि त्याची पडताळणी आदींबाबत अनियमितता आढळून आली. यानंतर आता आरबीआय कंपनीच्या सर्व कागदपत्रांचे ऑडिट करेल, त्यानंतरच या बंदीचा आढावा घेतला जाईल. कंपनीच्या कामकाजाचे विशेष ऑडिट केले जाईल.
Action against IIFL Finance Limited under Section 45L(1)(b) of the Reserve Bank of India Act, 1934https://t.co/8B9sNWKicG
— ReserveBankOfIndia (@RBI) March 4, 2024
स्पेशल ऑडिटनंतर समाधानकारक निकाल आल्यास IIFL फायनान्सला दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेनंतर एका महिन्यात आरबीआयची ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या काही महिन्यांपासून RBI कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापन आणि वैधानिक लेखा परीक्षकांशी या कमतरतांवर चर्चा करत आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांसह आरबीआय या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यामध्ये काही सुधारणा होत नसल्याने आरबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र याचा जुन्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. RBI Action On IIFL Finance Gold Loan|
हेही वाचा :
शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात ; सेन्सेक्स 73,800 च्या जवळ, निफ्टी 22,400 च्या खाली
“घराणेशाही विरोधात एवढी…”; कंगनाला इमरान हाश्मीचे सडेतोड उत्तर



