Politics News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर टोमॅटो-अंडी फेकण्याचा प्रयत्न; माजी मंत्र्याला अटक
Politics News : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ताफ्यावर टोमॅटो आणि अंडी फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून भाजप नेते रवनीत सिंह बिट्टू यांना लुधियानात पोलिसांनी ताब्यात घेतले.

Politics News : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ताफ्यावर टोमॅटो आणि अंडी फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून भाजप नेते आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. लुधियाना येथील पंजाब अॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीच्या (PAU) गेटजवळ ही कारवाई करण्यात आली.
मुख्यमंत्री भगवंत मान यांचा ताफा PAUच्या दिशेने जात असताना बिट्टू तेथे पोहोचले होते. त्यांच्या हातात टोमॅटो, अंडी होते. पोलिसांनी त्यांना ताफ्याजवळ जाण्यापूर्वीच रोखले आणि ताब्यात घेतले. बिट्टू मुख्यमंत्री मान यांच्या ताफ्याच्या अगदी जवळ पोहोचू शकले नाहीत.
Ludhiana, Punjab: Former Union Minister of State Ravneet Bittu shows tomatoes, liquor bottles and eggs to Punjab Chief Minister Bhagwant Mann’s convoy https://t.co/p3YArZzDAt
— IANS (@ians_india) September 19, 2026
लुधियाना येथे आम आदमी पक्षाच्या वतीने शनिवारी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भगवंत मान, मनीष सिसोदिया यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार होते. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मान यांचा ताफा PAUच्या परिसरातून जाणार होता.
#WATCH लुधियाना: पंजाब पुलिस ने आज पूर्व केंद्रीय मंत्री और भाजपा नेता रवनीत सिंह बिट्टू को हिरासत में ले लिया। जब मुख्यमंत्री भगवंत मान का काफिला पंजाब एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी (PAU) के गेट के पास से गुज़र रहा था, तब उन्होंने वहां विरोध प्रदर्शन किया था।
(सोर्स: रवनीत बिट्टू का कार्यालय)
— ANI_HindiNews (@AHindinews) September 19, 2026
दरम्यान, या घटनेचा संबंध शुक्रवारी घडलेल्या प्रकाराशी असल्याचे सांगितले जात आहे. बटाला येथे रवनीत बिट्टू यांच्या ताफ्यावर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि टोमॅटो फेकल्याचा आरोप करण्यात आला होता.
या घटनेच्या निषेधार्थ बिट्टू शनिवारी लुधियानामध्ये पोहोचले होते. आपल्या ताफ्यासोबत झालेल्या प्रकाराच्या निषेधार्थ आपण मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ताफ्यासमोर टोमॅटो घेऊन आल्याचे बिट्टू यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.





