रवींद्र कुमार राय यांची भाजपच्या झारखंड युनिटच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी माजी खासदार रवींद्र कुमार राय यांची भाजपच्या झारखंड युनिटच्या कार्याध्यक्षपदी तत्काळ नियुक्ती केली. ही नियुक्ती तात्काळ लागू होणार आहे. दरम्यान, आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शुक्रवारी निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.
या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान आणि शिवराज सिंह चौहान यांच्या नावांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश), नायब सिंग सैनी (हरियाणा), मोहन माझी हिमंता बिस्वा सरमा आणि विष्णू देव साई (छत्तीसगड) हे भाजपचे मुख्यमंत्री देखील स्टार प्रचारकांमध्ये आहेत. भाजपने निवडणुकीसाठी 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
झारखंड विधानसभा निवडणुका भाजप ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (एजेएसयू), जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) यांच्यासोबत युती करून लढणार आहे. भाजप 68 जागा, एजेएसयू 10 जागा, युनायटेड दोन जागा आणि एलजेपी एक जागा लढवणार आहे.
दुसरीकडे, झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) शुक्रवारी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली, असे जेएमएमने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणूक होत आहे.





