“शशी थरूर परदेशी माणूस…’अंग्रेजी आदमी'” ; रवी किशन यांची शशी थरूर यांच्यावर टीका

Ravi Kishan on Shashi Tharoor । लोकसभा निवडणुकीत भाजप यंदा अब कि बार ४०० पार चा नारा देत आहे. मात्र विरोधकांकडून त्यांच्या या नाऱ्याला तेवढाच विरोध होताना दिसून येतोय. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी,’भाजप लोकसभा निवडणुकीत ३०० जागापेक्षा अधिक जागा जिंकू शकणार नाही,’ असा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर भाजपाचे खासदार, अभिनेते रवी किशन यांनी सडेतोड उत्तर देत थरूर यांच्यावर टीका केली आहे.
शशी थरूर यांनी, “पाच टप्प्यातील मतदानानंतर भाजपाला ३०० जागा मिळणार नाहीत, असे दिसत आहे. बेरोजगारी, महागाई यामुळे सामान्य जनता सरकारवर नाराज आहे. उत्तर भारतातही काँग्रेसला यश मिळेल”, असे शशी थरूर म्हणाले होते. यावर पलटवार करताना रवी किशन यांनी शशी थरूर यांना ‘अंग्रेजी आदमी’ म्हणत त्यांच्यावर टीका केली.
‘ते’ इंग्रजी व्यक्ती आहेत Ravi Kishan on Shashi Tharoor ।
पुढे रवी किशन म्हणाले की, ‘आपण मनाली, शिमला याठिकाणी सुट्ट्या घालवण्यासाठी जातो. पण शशी थरूर आणि त्यांच्यासारखे लोक भारतात निवडणुका असताना सुट्ट्या घालविण्यासाठी येतात. त्यांना देशाबद्दल किंवा त्यांच्या गावाबद्दल काहीही माहीत नाही. त्यामुळेच मी म्हणेण की, ते इंग्रजी व्यक्ती आहेत.
रवी किशन हे गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत. पूर्व उत्तरप्रदेशमधील या मतदारसंघात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विधानसभा मतदारसंघ येतो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भोजपरी आणि बॉलिवूडचे अभिनेता रवी किशन यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार राम भुवल निशाद यांचा पराभव केला होता.
विरोधकांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार Ravi Kishan on Shashi Tharoor ।
मंगळवारी रवी किशन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ४ जून रोजी निकाल लागल्यानंतर विरोधकांमधील अर्धा डझन पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येईल आणि त्यांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल. विरोधकांच्या आघाडीतील २६ पक्षांचा मोठा पराभव झालेला आपल्याला दिसेल. यामध्ये सहा पक्ष तर पूर्णपणे नष्ट होतील.” असा दावा यावेळी त्यांनी केलाय.





