रविना टंडनच्या लेकीने पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं; ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Raveena Tandon Daughter | अभिनेत्री रविना टंडन हिची मुलगी राशा थडानीने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली आहे. ‘आझाद’ या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आणि सगळ्यांची मनं जिंकली. यानंतर तिने एका पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहून दमदार डान्स परफॉर्म केला. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एका पुरस्कार सोहळ्यात राशाने ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर नृत्य सादर केले. एवढेच नाही तर तिने माधुरी दीक्षितच्या ‘एक दो तीन’ आणि तिच्या स्वतःच्या डेब्यू चित्रपटातील ‘उई अम्मा’ या गाण्यांवरही अप्रतिम नृत्य सादर केले. नेटकऱ्यांनी देखील कमेंट करत’ ती इतर स्टार किड्सपेक्षा वेगळी आहे,’ असे म्हंटले आहे. Raveena Tandon Daughter |
View this post on Instagram
दरम्यान, राशा थडानी ‘आझाद’ मध्ये अजय देवगणच्या पुतण्या आमन देवगणसोबत झळकली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळवला असला, तरी राशाच्या अभिनय आणि नृत्याने तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. तिच्या ‘उई अम्मा’ या गाण्याला मोठी पसंती मिळाली. यानंतर आता पुरस्कार सोहळ्यातील नृत्य सादरीकरणाने तिने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहे. Raveena Tandon Daughter |
हेही वाचा :
Sambhajinagar News : शिळं चिकन खाल्ल्याने महिलेचा मृत्यू; १३ जणांवर उपचार सुरु




