Raveena Tandon : ‘हर हर गंगे’… रवीना टंडनचा आध्यात्मिक अंदाज; स्कूटीवर केला प्रवास
Raveena Tandon : रवीनाचा उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील प्रसिद्ध 'राम झूला' पुलावर स्कूटीवर प्रवास

Raveena Tandon: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या सोशल मिडियावर तिच्या साधेपणाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
सोशल मिडियावर रविनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील प्रसिद्ध ‘राम झूला’ पुलावर स्कूटीवर प्रवास करताना दिसली. तसेच मोठ्या उत्साहात ‘हर हर गंगे’चा जयघोषही केला. यावेळी रवीनाने गंगा मातेचे आशीर्वाद घेतले.
रवीनाचा हा साधा आणि आध्यात्मिक अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. सोशल मीडिया युजर्स तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.
या व्हिडिओमध्ये रवीनाने क्रीम रंगाची कॉटन साडी नेसल्याचे दिसत आहे. सोबतच तिने डोक्यावर पिवळ्या रंगाची ओढणी घेतली आहे, ज्यावर धार्मिक प्रिंट दिसत आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युझरने लिहिले, “ही खरंच रवीना टंडन आहे का?”, तर दुसऱ्याने , “खूप छान, हर हर गंगे,” असे लिहिले आहे.
View this post on Instagram
रवीना टंडनचे आगामी चित्रपट
रवीना टंडन लवकरच बहुप्रतिक्षित ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, दिशा पाटनी, संजय दत्त, अर्शद वारसी, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, परेश रावल, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर यांसारखे दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. अहमद खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, हा चित्रपट २६ जून रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. याशिवाय रवीनाकडे ‘विश्वनाथ अँड सन्स’ हा तमिळ चित्रपट देखील आहे, ज्याची तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
रवीना टंडनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची ‘घुडचढी’ या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्यासोबत संजय दत्त मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट २०२४ मध्ये ‘जिओ हॉटस्टार’वर रिलीज झाला होता. यात अरुणा इराणी, पार्थ समथान आणि खुशाली कुमार हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते.
हेही वाचा:





