Ratnagiri News : धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रत्नागिरीतील आरेवारे समुद्रावर पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत झाल्याची दुर्घटना घडली आहे. यात 3 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
जुनेद बशीर काझी, ( 30, ओसवाल नगर, रत्नागिरी), जैनब जुनेद काझी, ( 28, ओसवाल नगर, रत्नागिरी), उजमा समसुद्दीन शेख (वय 17, मुळ मुंबई मुंब्रा, सध्या ओसवाल नगर, रत्नागिरी), ऊमेरा समसुद्दीन शेख (वय 16, मुळ मुंबई मुंब्रा, सध्या ओसवाल नगर, रत्नागिरी) अशी मृत्यांची नावे आहेत. पर्यटक बुडाल्याची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रत्नागिरी शहरातील ओसवालनगर येथील कुटुंब आरे वारे येथील समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळच्या वेळी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्र स्नानाचा आनंद घेत असताना 3 महिला समुद्राच्या पाण्यात ओढल्या गेल्या. या महिलांनी आरडा ओरडा करताच त्यांच्यातील एका पुरुषाने त्यांना वाचण्यासाठी धाव घेतली. मात्र त्यांना वाचवताना तोही बुडाला. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.





