शिवव्याख्याते निलेश कोरडे यांचे पालकांना आवाहन शिंदे वासुली -शिवस्वराज्यासाठी राजे शिवाजी घडायला हवेत. पण त्यापूर्वी घराघरातून राजमाता जिजाऊ जन्माला यायला हव्यात. आणि ही जबाबदारी आईवडीलांची असून मुला मुलींना टिव्ही आणि मोबाईल पासून लांब ठेवा. आपल्या मुलीला विश्वसुंदरी बनवण्यापेक्षा संस्कारसुंदरी करा, तरच राजमाता जिजाऊ जन्माला येतील, असे मत शिवव्याख्याते निलेश कोरड यांनी व्यक्त केले. भामचंद्र नगर (वासुली, ता. खेड) येथील सभागृहात राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ महिला संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांना संबोधित करताना शिवव्याख्याते निलेश कोरडे बोलत होते. कोरडे यांनी आपल्या अमोघ व करारी वाणीने शिवशाहीचा इतिहास मांडला. प्रेक्षकांशी संवाद साधताना कोरडे यांच्या शिवव्याख्यानाने अवघे श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले होते. यावेळी लर्निंग ट्रीच्या प्राचार्या सुनिता बुट्टे पाटील, चिंचवड अध्यक्षा वैशाली टिळेकर, मावळ राष्ट्रवादी महिला अध्यक्षा शैलजा काळोखे, सविता जाधव (चिंचोली अध्यक्षा), सर्वांची सांडभोर (खेड ता. भाजपा महिला संघटन), मुख्याध्यापिका स्नेहल भोर, उपसरपंच कांताबाई गावडे, शोभा घुले, कल्पना भोरे, पुजा घुले, भारती दळवी, आरती तोंडे, मंगल घुले, आशाबाई पिंगळे, अनिता घुले, सिंधुबाई दळवी, भीमाबाई घुले, मंजुळा जांभुळकर, हिराबाई साबळे, संस्थेच्या सचिव उषा फावडे व सर्व संचालक मंडळ, वराळे लर्निंग ट्री इंग्लिश स्कूल, झित्राईमळा, वासुली व भामचंद्र नगर शाळेच्या विद्यार्थिनी व ग्रामस्थ महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमाता महिला संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा रत्नाताई पिंगळे यांनी श्रीनाथ बनकर व सुमित भोरे यांच्या मदतीने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते. जिजाऊंच्या जन्मोत्सवात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी बाल शिवाजी, राजमाता जिजाऊ व मावळ्यांचा पारंपरिक आकर्षक वेशभूषा करून संस्थेच्या सर्व सभासद महिलांनी ‘राजमाता जिजाऊ मॉं साहेबांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत गावातून रॅली काढली. प्रास्ताविक अध्यक्षा रत्नाताई पिंगळे यांनी केले,. तर सूत्रसंचालन हनुमंत दळवी व माजी उपसरपंच सुरेश पिंगळे देशमुख यांनी आभार मानले.