नगर -हातावर पोट असलेल्या व लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या विडी कामगारांच्या प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी विडी कामगार गुरुवारी (ता.4) रास्ता-रोको आंदोलन करतील, असा इशारा कामगार नेते कॉ. शंकर न्यालपेल्ली व शंकरराव मंगलारप यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक) व नगर विडी कामगार संघटना (इंटक) च्या वतीने आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.
विडी कामगारांच्या हाताला काम मिळून, विडी विक्रीला परवानगी मिळावी तसेच विडी कामगारांना शासनाकडून 10 हजार रुपये अनुदान मिळावे, अशा मागण्या विडी कामगारांतर्फे करण्यात आल्या आहेत. विडी कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उप -जिल्हाधिकारी संदिप निचित यांनी स्वीकारले.