राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव वाघोली येथे संपन्न

वाघोली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगरातील वडगावशेरी भागातील विजयादशमी निमित्त शस्त्रपुजन कार्यक्रम वाघोली येथील सातव हायस्कूल मैदान येथे संपन्न झाला.
अखिल भारतीय समरसता गतिविधि सह सयोंजक रवींद्र किरकोळे, नानासाहेब निंबाळकर सर यावेळी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी शस्त्रपूजन केले आणि स्वयंसेवकांनी घोष, व्यायाम आणि दंड युद्ध यांचे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नानासाहेब निंबाळकर सर यांनी आपल्या भाषणात भारतातील सामजिक विषमता दूर करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. रवींद्र किरकोळे यांनी संघाच्या शताब्दी वर्षात संघ सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, नागरी कर्तव्य, स्वदेशी जागरण या पंच परिवर्तना ने हिंदू समाजाचे आत्मरूपाचे शुद्धीकरण करणार असल्याचे सांगितले.
या उद्बोधनात त्यांनी संघ स्थापने मागचे संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे विचार स्पष्ट केले. त्यात त्यांनी म्हटले की, जर भारतात मुस्लिम आले नसते किंवा ख्रिचन आले नसते तरीही संघाची स्थापना केली असती, कारण संघाची स्थापना कुणा धर्माविरुद्ध लढण्यासाठी नाही तर संघाचे जीवित कार्य भारतातील मूळ निवासी विघटित हिंदू समाजाला त्याच्यातील आत्म् शुध्दीकरण करून संघटित करण्यासाठी झाली आहे.
राष्ट्र सेविका समितीचे वाघोलीत सघोष शिस्तबध्द पथसंचलन –
राष्ट्र सेविका समिती येरवडा भाग यांचा श्री विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव आणि पथ संचलनाचे आयोजन रविवारी (दि.६) वाघोली येथील मनपा शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते. समिती अधिकाऱ्यांकडून शस्त्रपूजन करून सघोष शिस्तबध्द संचलन वाघोली गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आले. या संचलनात सेविका पूर्ण गणेवशात होत्या. वाघोलीकरांनी संचलन मार्गावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले.





