\n

काय आहे ‘रणबाली’ची कथा?

\n

‘रणबाली’ हा एक पीरियड अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा १९व्या शतकातील ब्रिटिश राजवटीच्या काळात दक्षिण भारतातील रायलसीमा परिसरात घडते. सिंगनमला या गावातील लोककथेच्या माध्यमातून चित्रपटाची कथा सांगण्यात आली आहे.

\n

चित्रपटात विजय देवरकोंडा याने सिंगनमला कपिन बोब्बिली रणबाली ही मुख्य भूमिका साकारली आहे. त्याचा जन्म काही रहस्यमय परिस्थितीत झालेला असतो. एका भविष्यवाणीनुसार, त्याच्या जन्मामागे एक विशिष्ट उद्देश असतो. तो उद्देश पूर्ण होईपर्यंतच त्याचे आयुष्य असणार असल्याचे सांगितले जाते. पुढे रणबाली मोठा होतो आणि एक पराक्रमी योद्धा बनतो. यानंतर त्याचे जयम्मा म्हणजेच रश्मिका मंदाना हिच्याशी लग्न होते. जयम्माच्या आयुष्यात येण्यामुळे रणबालीच्या कठोर स्वभावातील एक हळवी बाजूही समोर येते.

\n

ब्रिटिश राजवटीविरोधात रणबालीचा संघर्ष

\n

चित्रपटाच्या कथेत १८७६ ते १८७८ या काळातील भीषण दुष्काळाची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. या काळात रायलसीमा परिसरातील सामान्य नागरिकांना अन्नटंचाई, दुष्काळ आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या जाचक करांचा सामना करावा लागतो. एकीकडे लोक उपासमारीने त्रस्त असताना ब्रिटिश अधिकारी मात्र कर वसुली सुरूच ठेवतात. तसेच परिसरात उत्पादित होणारे धान्य ब्रिटनला पाठवण्याची तयारी करतात.

\n

सर थियोडोर हेक्टर हा ब्रिटिश अधिकारी धान्य निर्यातीची योजना आखत असतो. यामुळे सामान्य नागरिकांच्या अडचणी आणखी वाढतात. आपल्या लोकांवर होणारा अन्याय पाहून रणबाली ब्रिटिश अधिकाऱ्यांविरोधात उभा राहतो. धान्याची निर्यात रोखण्याचा निर्धार करत तो ब्रिटिश राजवटीविरोधात बंड पुकारतो.

\n

या संघर्षाचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही होतो. रणबाली सतत घरापासून दूर राहत असल्याने त्याचे आणि जयम्माचे नाते तणावपूर्ण बनते. पुढे जयम्माला रणबालीच्या जन्माशी संबंधित भविष्यवाणीची माहिती मिळते आणि कथेला वेगळे वळण मिळते.

\n

हॉलिवूड अभिनेताही महत्त्वाच्या भूमिकेत

\n

या चित्रपटात विजय आणि रश्मिकासोबत हॉलिवूड अभिनेता अर्नोल्ड वोस्लूही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘द ममी’ या प्रसिद्ध चित्रपट मालिकेत खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अर्नोल्डने ‘रणबाली’मध्ये सर थियोडोर हेक्टर या ब्रिटिश अधिकाऱ्याची भूमिका केली आहे.

\n

चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल सांकृत्यायन यांनी केले आहे. तर निर्मितीची जबाबदारी ‘मैत्री मूव्ही मेकर्स’ने सांभाळली आहे. यापूर्वी विजय देवरकोंडा आणि दिग्दर्शक राहुल सांकृत्यायन यांनी २०१८ मध्ये ‘टॅक्सीवाला’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. आता ‘रणबाली’च्या ओटीटी प्रदर्शनानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Ranabaali Ott Release : रश्मिका-विजयची ‘रणबाली’ आता घरबसल्या पाहता येणार! हिंदीसह पाच भाषांमध्ये ओटीटीवर होणार रिलीज","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/11/ranabali.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Yogeshwari Bhosale","url":"https://www.dainikprabhat.com/author/yogeshwaribhosale/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rashmika-vijays-ranbali-can-now-be-watched-from-the-comfort-of-your-home-it-will-be-released-on-ott-in-five-languages-including-hindi#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/11/ranabali.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/rashmika-vijays-ranbali-can-now-be-watched-from-the-comfort-of-your-home-it-will-be-released-on-ott-in-five-languages-including-hindi#webpage","name":"Ranabaali Ott Release : रश्मिका-विजयची ‘रणबाली’ आता घरबसल्या पाहता येणार! हिंदीसह पाच भाषांमध्ये ओटीटीवर होणार रिलीज","url":"https://www.dainikprabhat.com/rashmika-vijays-ranbali-can-now-be-watched-from-the-comfort-of-your-home-it-will-be-released-on-ott-in-five-languages-including-hindi","inLanguage":"mr","description":"Ranabaali Ott Release ‘रणबाली’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जवळपास १२० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे ८०.८० कोटी रुपयांची कमाई केली.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rashmika-vijays-ranbali-can-now-be-watched-from-the-comfort-of-your-home-it-will-be-released-on-ott-in-five-languages-including-hindi#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/11/ranabali.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/rashmika-vijays-ranbali-can-now-be-watched-from-the-comfort-of-your-home-it-will-be-released-on-ott-in-five-languages-including-hindi#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/rashmika-vijays-ranbali-can-now-be-watched-from-the-comfort-of-your-home-it-will-be-released-on-ott-in-five-languages-including-hindi","name":"Ranabaali Ott Release : रश्मिका-विजयची ‘रणबाली’ आता घरबसल्या पाहता येणार! हिंदीसह पाच भाषांमध्ये ओटीटीवर होणार रिलीज"}}]}}}

Ranabaali Ott Release : रश्मिका-विजयची ‘रणबाली’ आता घरबसल्या पाहता येणार! हिंदीसह पाच भाषांमध्ये ओटीटीवर होणार रिलीज

Ranabaali Ott Release : रश्मिका-विजयची ‘रणबाली’ आता घरबसल्या पाहता येणार! हिंदीसह पाच भाषांमध्ये ओटीटीवर होणार रिलीज - Dainik Prabhat