हेल्मेट न घातल्याने रश्मिका चाहत्यावर रागावली, व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई – साऊथची स्टार रश्मिका मंदान्ना ‘नॅशनल क्रश’ आहे. ‘पुष्पा : द राइज’नंतर रश्मिका घराघरात प्रसिद्ध झाली. चित्रपट हिट झाल्यानंतर रश्मिकाची फॅन फॉलोइंग ज्या वेगाने वाढली आहे, रश्मिकाने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक जबरदस्त ओळख निर्माण केली आहे.
साऊथपासून टॉलिवूडपर्यंत काम करत या रश्मिकाने तिची फॅन फॉलोइंग दुप्पट केली आहे. ती नेहमीच चर्चेत असली तरी नुकताच रश्मिकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती एका चाहत्यावर चांगलीच चिडलेली दिसत आहे.
रश्मिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या रश्मिका आगामी तामिळ चित्रपट वारीसूच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान रश्मिका एका कार्यक्रमात पोहोचली. अलीकडेच या चित्रपटाचा ऑडिओ चेन्नईमध्ये लाँच करण्यात आला ज्यामध्ये ती उपस्थित होती. या कार्यक्रमानंतर आता एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रश्मिका तिच्या एका चाहत्याला ट्रॅफिक नियम न पाळल्याबद्दल फटकारताना दिसत आहे.
24 डिसेंबर रोजी चेन्नईच्या नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये रश्मिकाच्या आगामी ‘वारीसू’ चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्चचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर रश्मिका कारमध्ये बसून हॉटेलकडे निघाली. याचवेळी तिने पाहिले की काही चाहते तिला फॉलो करत आहेत आणि तीला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. रश्मिका तिची कार थांबवते आणि चाहत्याशी बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ येथे पहा
I Still Wounder , How one can hate a Human being Like Our @iamRashmika 🥺🤌pic.twitter.com/i0kaeVB3Af
— × Roвιɴ Roвerт × 🕊️ (@PeaceBrwVJ) December 25, 2022





