करन जोहच्या पार्टीत रश्मिका मंदान्नाने परिधान केला बोल्ड ड्रेस; कॅमेऱ्यात कैद झाल्या Oops Moment (व्हिडिओ)

मुंबई – दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी उत्सुक असलेली अभिनेत्री रश्मिका मंदान्ना नुकतीच करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली. यादरम्यान रश्मिकाने काळ्या रंगाचा मॅक्सी ड्रेस घातला होता, ज्याला हाताळताना तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला. यावेळी अभिनेत्री Oops Momentची शिकार झाली असून हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. रश्मिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
View this post on Instagram
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना नुकतीच करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली. या पार्टीत रश्मिकाने ब्लॅक बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती कमालीची दिसत होती. रश्मिकाचा बराचसा ड्रेस पारदर्शक होता आणि थाई हाय स्लिटमुळे अभिनेत्री खूपच अस्वस्थ दिसत होती. या ड्रेसमुळे पायऱ्या चढताना रश्मिकाला अडचण झाली मात्र तिने तो प्रसंग अगती सावधतेने हाताळला. मात्र यावेळी अभिनेत्रीची ही Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाली.
दरम्यान, गेल्या वर्षी रश्मिकाचा ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अल्लू अर्जुन दिसला होता. या चित्रपटाद्वारे रश्मिकाने श्रीवल्ली बनून लोकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. आता रश्मिका बॉलिवूडवर राज्य करण्याच्या तयारीत आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’मधून डेब्यू करणार आहे. याशिवाय ती रणबीर कपूरसोबत ‘एनिमल’ आणि अमिताभ बच्चन यांच्या सोबत ‘गुड बाय’मध्ये दिसणार आहे.





