VD 12 चित्रपटातील विजय देवरकोंडाच्या फर्स्ट लूकवर रश्मिकाने केली खास ‘कमेंट’

Entertainment | साऊथ सुपर स्टार विजय देवरकोंडा यांच्या नवीन चित्रपट VD 12 चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. फर्स्ट लूकमध्ये विजय देवरकोंडा खूपच इंटिमेट लूकमध्ये दिसत आहे. 2019 मध्ये विजयचा शेवटचा हिट ‘जर्सी’ होता, त्यानंतर त्याचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले.
View this post on Instagram
आता विजय देवरकोंडाच्या VD 12 कडून मोठ्या अपेक्षा आहे. विजय देवरकोंडाच्या फर्स्ट लूकवर कथित गर्लफ्रेंड रश्मिका मंदान्नानेही प्रतिक्रिया दिली आहे. VD 12 चे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरी यांनी केले आहे. हा एक स्पाय ॲक्शन थ्रिलर आहे. ज्यामध्ये विजय देवरकोंडा एका खतरनाक भूमिकेत दिसणार आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये विजय देवरकोंडा रफ आणि टफ लूकमध्ये दिसत आहे. तो यात ओरडतांना दिसत आहे.
विजय देवराकोंडाच्या या लूकवर कथित गर्लफ्रेंड रश्मिकाने फायर इमोजीसह प्रतिक्रिया दिली. त्याची पोस्ट शेअर करून मॅडनेस असेही लिहिले आहे.
दरम्यान यावरून पुन्हा एकदा रश्मिका आणि विजय देवरकोंडा डेटिंग करत असल्याच्या चर्चा सोशलवर रंगल्या आहे. दरम्यान, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी मिळून ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ सारखे चित्रपट केले. गेल्या काही दिवसांपासून ते डेटिंग करत असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीच काही बोलले नाहीत, फक्त मित्रच याबद्दल सांगत होते. VD 12 चित्रपटाबाबत सांगायचे झाल्यास, हा चित्रपट 28 मार्च 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.





