मुंबई – अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते आणि तिला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. सध्या रश्मिका तिच्या एका जाहिरात व्हिडिओमध्ये चिकन बर्गर खाल्ल्यामुळे ट्रोल केले जात आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स रश्मिकाला लबाड म्हणत ट्रोल केले आहे. आणि स्वत:ला शाकाहारी म्हणवून घेत आहेत आणि चिकन बर्गर खाते असेही लोकांनी म्हटले आहे.
एका व्हायरल व्हिडिओ जाहिरातीत, रश्मिका मंदान्ना एका लोकप्रिय जंक फूड ब्रँडची जाहिरात करण्यासाठी चिकन बर्गर खाताना दिसत आहे. विशेष म्हणजे, रश्मिका स्वतःला खऱ्या आयुष्यात शाकाहारी असल्याचा दावा केला आहे. अशात जेव्हा तिचा चिकन बर्गर खाताना जाहिरातीचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तिला लगेच ट्रोल करण्यात आले. एका ट्रोलने लिहिले की,’ते पैशासाठी काहीही करायचे का ?’ तर तिच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे. आणि म्हंटले आहे की,’तिची निवड आहे की तिला काय खायचे आणि काय खायचे नाही’
दरम्यान, रश्मिका मंदान्नाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रश्मीने विजय सोबत तामिळ चित्रपट ‘वारीसु’ मध्ये दिसली होती. तिच्याकडे संदीप रेड्डी वंगा यांचा अॅनिमल हा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.