Pune Metro | पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन शहरातील प्रवास जलद गतीने व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर पुणे मेट्रोची सेवा सुरू करण्यात आली. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पयीय अधिवेशातील बजेटमध्ये पुणे मेट्रोसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली अ्सून काही नवे मार्गांची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारत असताना आता मेट्रोची अपेक्षित वेगाने प्रवासी संख्या वाढताना दिसत नाही. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होऊन संपूर्ण 33 किलोमीटर मार्गावर मेट्रोसेवा सुरू करण्यात आली. मात्र, अपेक्षित वेगाने प्रवासी संख्येत वाढ झालेली दिसत नाही. मंडई, स्वारगेट ही स्थानके सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवास संख्या दोन लाखांच्या पुढे पोहोचणे अपेक्षित असताना अद्यापही सरासरी प्रवासी संख्या एक लाख 60 हजारांच्या दरम्यानच असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता प्रवाशांना मेट्रोस्थानकापर्यंत सहज जाता यावे यासाठी मेट्रोने विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सरासरी संख्या ही 1लाख 44 हजार असून पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या 63 हजार आहे. तर वनाज ते रामवाडी मार्गावरील दैनंदिन प्रवास संख्या 82 हजार आहे. ही आकडेवारी पाहता स्वारगेट ते पिंपरी चिंचवड मेट्रो मार्गावरील प्रवासी संख्या कमी असून त्याबदल्यात वनाज ते रामवाडी या मार्गावरील प्रवासी संख्या अधिक असल्याचे दिसते. असे असले तरी मेट्रोने प्रवासी वाढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चार महिन्यातील प्रवासी संख्या आणि उत्पन्न डिसेंबर महिन्यात 46 लाख 94 हजार 147 प्रवासी तर सात कोटी 38 लाख उत्पन्न जानेवारी 49 लाख 64 हजार 224 प्रवासी तर सात कोटी 87 लाख उत्पन्न फेब्रुवारी 43 लाख 7000 प्रवासी तर सहा कोटी 73 लाख उत्पन्न मार्च 44 लाख 81 हजार 613 प्रवासी तर 7 कोटी 1 लाख उत्पन्न