अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा जामीन फेटाळला

पुणे – अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर.व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला आहे.

सुमित चंद्रकांत साळवे (वय 21, रा. कवडीपाट, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे. याबाबत पीडित 14 वर्षीय मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली आहे. 23 फेब्रुवारी रोजी सुमित याने लग्नाच्या अमिषाने पीडितेला पळवून नेले. तिच्यावर वेळोवेळी संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी साळवे याला अटक केली आहे.

तो न्यायालयीन कोठडीत आहे. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. जामीन मिळाल्यास तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी ऍड. पाठक यांनी केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here